उध्दव ठाकरे महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देणार?
Raju tapal
December 13, 2024
82
उध्दव ठाकरे महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देणार?
संजय राऊत यांनी दिले स्पष्ट संकेत
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. राज्यात काही महिन्यात मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे एकला चलो रे असा निर्णय घेणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला. त्यात आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याने भर पडली आहे. संजय राऊत यांनी उध्दव ठाकरेंची शिवसेना मविआतून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यावर काँग्रेसकडून वेट अँण्ड वॉच अशी प्रतिक्रिया आली आहे.
आत्तापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेलेल्या नाहीत. आम्ही कोणताही निर्णय घेताना तीन पक्ष एकत्र बसून घेतो आम्ही जो निर्णय घेऊ तो निर्णय घेताना माननीय उद्धव ठाकरे ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तीन पक्ष एकत्र बसून घेऊ, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलेय. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलेय. ठाकरे वेगळा निर्णय घेणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कधीही लागू द्या, शिवसेनेने मुंबईसह 14 महानगरपालिकेची तयारी सुरू केली आहे. राजधानी मराठी माणसाची आहे आणि ते महाराष्ट्रात राहिले पाहिजे, यासाठी आम्ही प्राणाची बाजी लावून निवडणुका लढू, असे सांगायलाही राऊत विसरले नाहीत.
संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून मात्र सावध प्रतिक्रिया देण्यात आली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टता आल्यानंतरच निर्णय घेऊ अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, आघाडी म्हणून आमची एकत्र लढण्याची तयारी असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यांनी वेगळं लढण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांचा तो निर्णय असेल, स्पष्टता आल्यानंतरच काँग्रेस निर्णय घेणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद आहे. पत्रकार परिषदेत ठाकरे कोणती मोठी घोषणा करणार? याबाबत राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. ठाकरे महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सूरू आहेत. त्यातच आता ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे यात अजून भर पडली आह.
Share This