उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी वालचंदनगर ता.इंदापूर येथील एका शिक्षकाने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.
दीपक पोपट खरात असे राजीनामा दिलेल्या शिक्षकाचे नाव असून खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत होते.
१ फेब्रुवारी २००२ पासून ते सेवेत असून सध्या वालचंदनगर येथील पाठशाळा क्रमांक ३ येथे प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर कार्यरत होते.
खरात यांनी राजीनामापत्रात असे म्हटले आहे, माझी अर्हताकारी सेवा २० वर्षे ६ महिने झालेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दर्शवून शिवसेना या पक्षसंघटनेचे पूर्णवेळ काम करणे या कारणास्तव मी माझ्या नोकरीचा राजीनामा स्वेच्छेने देत आहे. आजवर आपल्या संस्थेत शाळा व्यवस्थापकांचे ,अधिकारी, मुख्यापकांचे ,सरकारी शिक्षकांचे, जे सहकार्य लाभले त्याबद्दल आभार मानतो माझा राजीनामा मंजूर करण्यात यावा ही विनंती करतो असे दीपक खरात यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे.