सामंत बंधूंच्या नेतृत्वाखाली राजन साळवींनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
माजी आमदार राजन साळवी शिवसेनेत करणार जाहीर प्रवेश
मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत आणि आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली. त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत कोणतीही नाराजी नसून, आम्ही त्यांचे शिवसेनेत मनःपूर्वक स्वागत करीत आहोत, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश आज दुपारी ३ वाजता टेंबी नाका येथे पार पडणार असल्याचे देखील मा. ना. उदयजी सामंत यांनी म्हटले. या बैठकीला आमदार किरण सामंत, बंटी पाटील उपस्थित होते.