• Total Visitor ( 84970 )

उरूळीकांचन येथे महामार्गावर भर दुपारी गोळीबार ;

Raju Tapal October 23, 2021 40

उरूळीकांचन येथे महामार्गावर भर दुपारी गोळीबार ; वाळूव्यावसायिकासह आणखी एकाचा गोळीबारात मृत्यू 

    

उरूळीकांचन येथे महामार्गावर भर दुपारी झालेल्या गोळीबारात दौंड तालुक्यातील वाळूव्यावसायिकासह आणखी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे समजते.

राहू येथे बेकायदा वाळू उपश्यावरून 2011 मध्ये दौंड बाजार समितीचे तत्कालीन संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत भाऊ रमेश सोनवणे यांच्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप संतोष जगताप याच्यावर आहे. या प्रकरणात जामिनावर संतोष जगताप बाहेर होता. गोळीबाराची घटना आज शुक्रवार दि.22 ऑक्टोबर ला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर -पुणे महामार्गावर हॉटेल सोनई समोर घडली.

या घटनेत दहिटणेरोड, चव्हाणवाडी, माधवनगर, राहू ता.दौंड येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप  वय -38 ,  स्वागत बाप्पू खैरै वय -25 रा. दत्तवाडी,उरूळीकांचन ता.हवेली हे मृत्यूमुखी पडले. जगताप यांचे दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जगताप हे  दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावरील हॉटेल सोनई समोर थांबले होते. अचानक सोनवणे गँगच्या चार पाच जणांनी जगताप व त्यांच्या अंगरक्षकावर घातक हत्याराने हल्ला चढवून गोळीबार केला. यात जगताप व दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत जगताप यांनी प्रत्यूरादाखल केलेल्या गोळीबारात खैरे जागीच ठार झाला. जगताप, खैरे, जखमींना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता संतोष जगताप यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

लोणीकाळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Share This

titwala-news

Advertisement