• Total Visitor ( 84438 )

उशीद ग्रामपंचायतीने दिलेली घरपट्टी ग्रामसेविकेने बेकायदेशीर रित्या घरी जाऊन आणली परत?

Raju Tapal January 28, 2022 34

उशीद ग्रामपंचायतीने दिलेली घरपट्टी ग्रामसेविकेने बेकायदेशीर रित्या घरी जाऊन आणली परत?मनमानीस रोखणार कोण?

 मौजे उशीद आरेला ग्रामपंचायत हद्दीत सुरेखा सागर उघडे या आपले पती व तीन मुलासह राहतात, त्या गावातील स्थानिक रहिवासी असून मोलमजुरी करून कुंटूबाचा उदरनिर्वाह करतात, त्यांच्या घराच्या पाठिमागील जागा गावठाण असून तेथे एक कच्ची झोपडी होती ,ती यांच्या च कब्जेवहिवाटीस असून त्याला घरपट्टी लावण्यासाठी तिचा मोठा मुलगा सिंकदर सागर उघडे याने १२ नोव्हेंबर २०२१ रोजी ग्रामपंचायतीकडे रितसर अर्ज केला होता. यांनतर सरपंच, सदस्यांच्या मासिक बैठकीत सिंकदर उघडे याला घरपट्टी देण्याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर झाला आणि ५ जानेवारी २०२२रोजी पावती क्रमांक३०० रक्कम १०४,घर क्रंमांक ३२६अशी घरपट्टी दिली. यानंतर २०/२५ दिवसांनी घरी कोणी नसताना शिपाई दिलीप शिंगे,आणि डाटा आँपरेटर यांना बरोबर घेऊन सिंकदर उघडे यांच्या घरी जाऊन लहान मुलगा सूरज सागर उघडे याला भूलथापा देऊन, त्याची फसवणूक करून आम्हांला कोणालाही काही एक न कळवता, ग्रामपंचायतीने दिलेली घरपट्टी  ग्रामसेविका श्रीमती माधुरी राठोड यांनी बेकायदेशीर, गैरकृत्याने परत नेली. ही मनमानी, दादागिरी नव्हे काय?असा सवाल उपस्थित करून मासिक मिंटिगमध्ये ठराव संमत झाला असताना, कोणाची तक्रार नसताना, आम्ही घरात नसतात, चोराप्रमाणे येवून घरातील घरपट्टी परत घेऊन जाण्याइतपत यांची हिंम्मत कशी झाली?असा संताप व्यक्त करुन संबंधित ग्रामसेविकेला निंलबित करावे अशी मागणी  कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या कडे लेखी तक्रारीव्दारे केली आहे.कारवाई न झाल्यास" घरपट्टी"चोरीला  गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्याच्या विचारात असल्याचे सुरेखा सागर उघडे यांनी सांगितले.

Share This

titwala-news

Advertisement