शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची ग्रामपंचायत व नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वनमहोत्सवानिमित्त आयोजित केलेला वृक्षारोपण व वृक्षवाटप कार्यक्रम आज रविवार दि.३/०७/२०२२ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
पुणे जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई पाचूंदकर यांच्या हस्ते करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास चिंचोली मोराची गावचे उपसरपंच राहूल नाणेकर, नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनचे संस्थापक संतोष उकिरडे, माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे पाटील, पोलीस अधिकारी वाघ, गणेश धुमाळ, शरद धुमाळ, छायाताई उकिरडे, काळूराम उकिरडे, सावळा धुमाळ, सागर येवले ,शितल नाणेकर, आरती नाणेकर, प्रमिला धुमाळ, भारती धुमाळ, प्रियंका धुमाळ, शामराव धुमाळ, रंजना कदम, नवनाथ नाणेकर, महादेव उकिरडे, दगडूशेठ मिडगुले, महैश उकिरडे, सागर उकिरडे, प्रा.विठ्ठल पुंड, प्रदिप नाणेकर ,मेघराज कामठे वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनचे संस्थापक संतोष उकिरडे यांनी चिंचोली मोराची गावाला भेडसावणा-या शेती व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत पुणे जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई पाचूंदकर यांच्यासमोर व्यथा मांडली.
या कार्यक्रमात बोलताना पुणे जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई पाचूंदकर म्हणाल्या, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज तुकोबारायांना अगोदरच समजली होती. आपल्याला समजायला फार उशीर झाला. चिंचोली मोराची गावच्या पाणीप्रश्नाबाबत बोलताना पाचूंदकर म्हणाल्या, गाव तिथे पाणी ही योजना आपण आणलेली आहे. ते पाणी कसं आणायचे, त्यासाठी काय करता येईल ,ते पाणी आपल्याला पूर्णत: कसे मिळेल, ते पाणी आपल्या गावाला,वाड्यावस्त्यांना कसे मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन असे आश्वासन पुणे जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई पाचूंदकर यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.