• Total Visitor ( 84577 )

वेगवेगळ्या अपघातात ७ जणांचा मृत्यू

Raju Tapal February 15, 2022 31

वेगवेगळ्या अपघातात ७ जणांचा मृत्यू
   
वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
 नगर - पुणे महामार्गावर चास शिवारात शिवशाही बसने दुचाकीस जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले.
राळेगणसिद्धी येथील आदर्श पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय क्षीरसागर ,माजी सरपंच रोहिणी गाजरे यांचे पती दादाभाऊ गाजरे अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे असून शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
नगर येथील कामे आटोपून राळेगणसिद्धीकडे जात असताना जेवणासाठी ते चास शिवारातील हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. जेवण आटोपल्यानंतर राळेगणसिद्धीकडे जात असताना रस्ता ओलांडत असताना नगरकडे जाणा-या शिवशाही बसने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने दुचाकीसह ते दोघे फरफटत गेले.
       
अपघाताच्या दुस-या घटनेत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील मित्राला कारमधून सोडविण्यासाठी जात असताना ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात राहूल सुरेश आळेकर वय - २२ रा.श्रीगोंदा, केशव सायकर वय - २२ रा.काष्टी, आकाश रावसाहेब खेतमाळीस वय - १८ रा.श्रीगोंदा या तिघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला.
रविवारी रात्री १ वाजता श्रीगोंदा - काष्टी रस्त्यावरील हॉटेल अनन्यासमोर हा अपघात झाला.
          
अपघाताच्या तिस-या घटनेत पुणे - सोलापूर महामार्गावर कासुर्डी टोलनाक्याजवळ रोहन हॉटेल समोर उभ्या असलेल्या एन एल ०१ ए डी ६४७४ या क्रमांकाच्या  मालवाहतूक ट्रकला पाठीमागून एम एच १४ सी झेड ६५६५ या क्रमांकाच्या स्विफ्ट कार धडकून झालेल्या अपघातात बापू अण्णापा कोळी रा.येरवडा पुणे, शिवयोगी गणपती देसाई रा. वडगाव शेरी पुणे या दोघांचा मृत्यू झाला.
कारमध्ये एक मुलगी दोन व्यक्ती जखमी अवस्थेत असल्याने नागरिकांनी रूग्णवाहिकेतून उपचारासाठी यवत येथील सरकारी रूग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.
हॉटेल चालक नितीन रोहिदास कांबळे यांनी या अपघाताची फिर्याद यवत पोलीस ठाण्यात  दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This

titwala-news

Advertisement