वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू ; दोन जण जखमी
Raju Tapal
November 01, 2021
40
वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू ; दोन जण जखमी
वेगवेगळ्या दोन ठिकाणी झालेल्या अपघातात दोघे जण ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना पुणे -सोलापूर महामार्ग तसेच चाकण -शिक्रापूर रस्त्यावर घडली.
पुणे -सोलापूर महामार्गावर कुरकुंभ ता.दौंड हद्दीत पुण्याहून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणा-या एम एच १२ आर एन ४२९५ या क्रमांकाच्या टाटा झेस्टा कारने रस्त्याच्या कडेने पायी चालणा-या जेष्ठ नागरिकाला पाठीमागून धडक दिल्याने महादेव नारायण साळूंके वय ७० यांचा जागीच मृत्यू झाला.
सदाशिव साळूंके यांनी यासंदर्भात पोलीसांत फिर्याद दिली.
निष्काळजीपणे वाहन चालवून व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रमाणे चारचाकी वाहनचालकाविरूद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक महेश आबनावे अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.
अपघाताच्या दुस-या घटनेत ,चाकण - शिक्रापूर रस्त्यावरील भोसे ते शेलगाव दरम्यान दत्तमंदिराजवळ दोन मालवाहू टेम्पोची समोरासमोर जोरात धडक झाल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले.
सुनील गंगाधर जोगदंड असे अपघातात ठार झालेल्या टेम्पोमधून प्रवास करणा-या प्रवाशाचे नाव आहे.
चालकासह दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींची नावे समजू शकली नाहीत.
चाकण पोलीस या अपघाताचा पुढील तपास करीत आहेत
Share This