जेष्ठ अभिनेते, नाटककार माधव वझे यांचे निधन
शिरूर :- जेष्ठ अभिनेते, नाटककार माधव वझे यांचे ८५ व्या वर्षी बुधवारी पुण्यात निधन झाले.
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त "श्यामची आई" चित्रपटात माधव वझे यांनी साने गुरूजींची भूमिका साकारली होती.
श्यामची आई या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
अभिनेते, नाटककार माधव वझे यांचा जन्म २१ आॅक्टोबर १९३९ रोजी पुण्यात झाला होता. पुण्यातील वाडिया काॅलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली.अनेक नाटकांसाठी त्यांनी लेखन केले.डिअर जिंदगी, थ्री इडियट्स या चित्रपटात त्यांनी काम केले. अभिनेता, दिग्दर्शक,नाट्य गुरू, नाट्यसमिक्षक अशी ओळख माधव वझे यांना लाभली होती.शेक्सपियरच्या "हॅम्लेट"या नाटकाचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केले होते.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे)