प्रत्येक मुल हे स्वतंत्र आहे. त्याच्यातील क्षमता व कौशल्ये ही वेगवेगळी असतात . विद्यार्थ्यामधील क्षमता व कौशल्ये लक्षात घेवून विद्यार्थ्यांचे करियर घडवावे असे आवाहन शिरुर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी केले .
लिड स्कूल व ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल मध्ये नुकत्याच शैक्षणिक करार झाला असून त्या अंतर्गत शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल मध्ये करण्यात आले होते .यावेळी कळमकर बोलत होते. शाळेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेराम घावटे, गोविंद पाचंगे, मारुती कदम, नवनाथ फरगडे, प्रा. डॉ. नितीन घावटे आणि ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुलचे मुख्याध्यापक रुपाली जाधव, संतोष येवले लीड स्कूलचे निशांत देशपांडे आणि जितेंद्र मितबावकर,संध्या कामडी आदी याप्रसंगी उपस्थित होते.
कळमकर यावेळी बोलताना म्हणाले, जगात बदल होत आहे. शिक्षणातही बदल होत आहे कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. प्रत्येक मुल स्वतंत्र आहे त्याची क्षमता व कौशल्ये वेगवेगळी असतात . मुलांमधील कौशल्ये क्षमता लक्षात घेवून विद्यार्थ्याचे करियर घडवावे . मुलांच्या विविध प्रकारच्या संकल्पना लहानपणीच पक्के होणे गरजेचे आहे असे मत कळमकर यांनी यावेळी व्यक्त केले.
डॉ. प्रा .राजेराम घावटे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम ज्ञानगंगा संस्थेचे मार्फत राबविले जातात . आंतराष्ट्रीय पातळीवर काम करणारी लीड स्कूल आणि ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन ज्ञानगंगा इंटरनेशनल स्कुल, बाबुराव नगर, शिरूर येथे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले
सूत्र संचालन शोभा आनप यांनी केले. तर आभार स्वीटी गायकवाड यांनी मानले.