वीज कंत्राटी कामगारांकडून पुण्यातील रास्ता पेठ येथे प्रशासन व ऊर्जामंत्रालयाचा निषेध
Raju Tapal
November 05, 2021
36
ज कंत्राटी कामगारांकडून पुण्यातील रास्ता पेठ येथे प्रशासन व ऊर्जामंत्रालयाचा निषेध
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिनही वीज कंपनीतील हजारो वीज कंत्राटी कामगारांचे दिवाळीपूर्वी वेतन व बोनस न मिळाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने पुण्यातील रास्ता पेठ येथील वीज कंपनी कार्यालयासमोर प्रशासन व ऊर्जा मंत्रालयाचा जाहीर निषेध केला.
कोरोना काळात वीज कामगारांनी जीव धोक्यात घालून राज्यातील जनतेला अखंडीत व सुरळीत वीज सेवा देण्यात मोठे योगदान दिले. ५५ कामगार शहीद झाले. तसेच वीजबील वसुलीसाठी प्रसंगी वीजग्राहक नागरिकांच्या शिव्या ,मार खावून वीजबील वसुली देखील जोमाने केली.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या कष्टकरी कंत्राटी कामगारांचे वेतन व बोनस दिवाळीपूर्वी मिळणे गरजेचे आहे असे पत्र संघटनेने दिनांक १३ सप्टेंबर २०२१ रोजी राज्याचे प्रधान ,ऊर्जा सचिव तसेच तिनही वीज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले होते. दीड महिना अगोदर पत्र देवूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक दूर्लक्ष केल्याने जाहीर निषेध करण्यात आला.
Share This