• Total Visitor ( 84490 )

विशाल परबाचं अखेर ठरलंय

Raju tapal October 25, 2024 26

विशाल परबाचं अखेर ठरलंय
सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक विशाल परब हे सोमवार दि.२८ऑक्टोबर रोजी तेथील जनतेच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज करणार दाखल..

अखेर विशाल परब यांनी आपण काही करून,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अर्ज भरून निवडणूक लढणारचं असा  निश्चय केला आहे.तर आपल्याला पाठिंबा द्यायला हजारोंच्या संख्येने वाजत गाजत गुलाल उधळायला या असे आवाहन विशाल परब यांनी जनतेला केले आहे.

सिंधुदुर्ग:-गोरगरिबांच्या वेळ प्रसंगाला धावणारे अशी ओळख असलेले भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल प्रभाकर परब हे गेली ३ ते ४ वर्षे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप पक्ष मजबूत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत हा मतदारसंघ पिंजून काढला होता.तसेच ते भाजप पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते.मात्र ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात आल्याने या मतदारसंघात महायुतीकडून शालेय शिक्षण मंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना ही उमेदवारी जाहीर झाली आहे.त्यामुळे विशाल परब हे आता अपक्ष म्हणून निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत.सोमवार दि.२८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिव उद्यान सावंतवाडी येथून ते जनसमुदायाच्या साक्षीने भव्य दिव्य अशी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
 

Share This

titwala-news

Advertisement