तालुकास्तरीय व्हाॅलिबाॅल स्पर्धेत विठ्ठलवाडीतील मुला-मुलींच्या संघाची बाजी
शिक्रापूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे संचलित श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर तालुकास्तरीय व्हाॅलिबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शिरूर तालुक्यातील विविध शाळांमधील चौदा,सतरा,एकोणीस वर्षे वयोगटात मुला-मुलींच्या एकूण १०३ व्हाॅलिबाॅल संघांनी सहभाग नोंदवला. मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी ही माहिती "टिटवाळा न्यूज"ला दिली.
तालुकास्तरीय व्हाॅलिबाॅल स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-
१४ वर्षाखालील मुले:प्रथम श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी द्वितीय कै.रा.गे.पलांडे माध्यमिक आश्रम शाळा,मुखई,तृतीय इंग्लिश स्कूल-उरळगाव, मुली: प्रथम आर.बी. गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे,द्वितीय समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक विद्यालय-तळेगाव ढमढेरे,तृतीय श्रीदत्त माध्यमिक विद्यालय पिंपरखेड,१७ वर्षाखालील मुले: प्रथम कै.रा.गे पलांडे माध्यमिक आश्रम शाळा-मुखई द्वितीय:आर.बी.गुजर प्रशाला-तळेगाव ढमढेरे, तृतीय न्यू इंग्लिश स्कूल-भांबर्डे,मुली: प्रथम श्री पांडुरंग विद्या मंदिर-विठ्ठलवाडी, द्वितीय कै.रा.गे.पलांडे माध्यमिक आश्रम शाळा मुखई,तृतीय आर.बी. गुजर प्रशाला-तळेगाव ढमढेरे,१९वर्षे वयोगट मुले: प्रथम संभाजीराव भुजबळ माध्यमिक विद्यालय-तळेगाव ढमढेरे,द्वितीय माध्यमिक विद्यालय- सणसवाडी,तृतीय विजयमाला इंग्लिश मीडियम स्कूल-शिरूर,मुली: प्रथम श्रीदत्त माध्यमिक विद्यालय पिंपरखेड,द्वितीय संभाजीराव भुजबळ माध्यमिक विद्यालय-तळेगाव ढमढेरे,तृतीय कै.रा.गे.पलांडे उच्च माध्यमिक आश्रम शाळा-मुखई या विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आदर्श कोच म्हणून ओंकार शेलार याचा विशेष गौरव करण्यात आला. तालुकास्तरीय व्हाॅलिबाॅल स्पर्धा पार पाडण्यासाठी शिरूर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष किरण झुरंगे,सचिव मनोज धिवार यांनी विशेष प्रयत्न केले.
संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती आण्णा गवारे,आरएसएसचे पुणे विभाग संघचालक संभाजी गवारे,उपाध्यक्ष लव्हाजी लोखंडे,संचालक काळुआण्णा गवारे, लक्ष्मण गवारे,राहुल गवारे,भाजपाचे तालुका अध्यक्ष जयेश शिंदे,माजी उपसरपंच राजेंद्र शिंदे,हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष बबन गवारे,उपाध्यक्ष बापू पवार,तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब गवारे,महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे,राज्य मुख्याध्यापक आश्रम शाळा महामंडळाचे उपाध्यक्ष तुकाराम शिरसाठ,सेवानिवृत्त जिल्हा विशेष लेखा परीक्षक चांगदेव पिंगळे,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मारुती कदम,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रामदास थिटे,शिक्षकेतर संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल गवारे,प्रा.संदीप गवारे,मधुकर दोरगे,मुख्याध्यापक अशोक दहिफळे,बाळासाहेब चव्हाण,एकनाथ चव्हाण,वसंत रणसिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता गवारी यांनी केले.
विजय ढमढेरे (प्रतिनिधी)