श्री.क्षेत्र विठ्ठलवाडी येथील बालचमुंचा दहीहंडी सोहळा
-----------------
शिरूर तालुक्यातील श्री.क्षेत्र विठ्ठलवाडी येथील सनराईज इंग्लिश मिडियम स्कूलमधील बालचमुंनी दहिहंडी उत्सव साजरा केला.
गोविंदा आला रे आला...., जरा मटकी संभाल मितवाला.....कृष्ण जन्मला गं बाई ,कृष्ण जन्मला या गीतांच्या तालावर सनराईज इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थिनींनी दहीहंडी भोवती ठेका धरत टिपरी नृत्य केले.
कृष्णाच्या वेशभुषेतील मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक राहूल गवारे यांच्या प्रेरणेने सनराईज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आल्याची माहिती कलाशिक्षक प्रविणकुमार जगताप यांनी दिली.
सनराईज इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिक्षिका योगिता हरगुडे, मीनाक्षी मोकाशी ,सीमा गवारी, पौर्णिमा ढमढेरे यांनी दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला. श्री.पांडूरंग विद्यामंदीर विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यावेळी उपस्थित होते.