विविध प्रकारची स्किल विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी
Raju Tapal
December 24, 2021
35
विविध प्रकारची स्किल विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी ; माजी प्राचार्य नंदकुमार चव्हाण यांचे आवाहन
ज्ञानाच्या कक्षा बदलत असतात त्या करिता विविध उपक्रमाचे आयोजन महत्वाचे असल्याचे मत शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माजी प्राचार्य नंदकुमार निकम यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बोरा महाविद्यालयात करियर कट्टा या उपक्रमाचे उदघाटन शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माजी प्राचार्य नंदकुमार निकम यांच्या हस्ते करण्यात आले .
निकम यावेळी बोलताना म्हणाले की , ज्ञानाच्या कक्षा नेहमी बदलत असतात त्या करिता विविध उपक्रमाचे आयोजन महत्वाचे आहे . करियरच्या दृष्टीने महत्वाचे असणारे विषय करियर कट्टा अंतर्गत आहे . प्रशासनातही कामाची मोठी संधी आहे . आय ए एस मध्ये यश मिळविण्यामध्ये बिहार मधील अनेक जण असतात .विविध प्रकारची स्किल विद्यार्थ्यानी आत्मसात करावी. सामान्यातला सामान्य माणूसही उद्योजक बनू शकतात. मोठी स्वप्ने पाहा व ती साकारण्यासाठी प्रयत्न करा . असे ही ते म्हणाले .
प्राचार्य डॉ .के .सी .मोहिते यावेळी बोलताना म्हणाले की,
आपल्यातील क्षमता व कौशल्ये लक्षात घेवून करियर निवडावे व विविध कौशल्ये आत्मसात करावीत. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी' करियर कट्टा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आय.ए.एस. आपल्या भेटीला, उद्योजकता विकास, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पायाभूत अभ्यासक्रम इ. उपक्रम राबविण्यात येणार आहेत . स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या तसेच स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा असणा-या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त उपक्रम असल्याचे मोहिते म्हणाले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ .प्रा .अंबादास केत यांनी केले. प्रा. हरिदास जाधव ,प्रा. रवींद्र गणोरकर यांनीही यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले . सूत्रसंचालन प्रा. क्रांती पैठणकर ( गोसावी ) यानी केले . प्रा डॉ . समाधान बोरसे यांनी आभार मानले . प्रा.डॉ . पदमाकर प्रभुणे ,प्रा डॉ पी .एस .वीरकर यावेळी उपस्थित होते .क्रिडा स्पर्धेत विविध स्पर्धेतील यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला .
Share This