• Total Visitor ( 84209 )

शिराळा येथे मतदार जनजागृती रॅली

Raju tapal November 13, 2024 43

शिराळा येथे मतदार जनजागृती रॅली
सि ई ओ संजीता महापात्र यांचा सहभाग: शेकडो कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सहभाग
  पिंक फोर्सचा मोठा सहभाग

अमरावती, दि.१३: अमरावती पंचायत समिती स्विप अंतर्गत पिंक फोर्स समिती  शिराळा यांच्या वतीने मतदार जनजागृती रॅली १२नोव्हेंबरला काढण्यात आली. या रॅलीत जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी सहभागी झाल्या होत्या. 
      शिराळा गावातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून रॅलीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सजविलेली बैल बंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो.. अशा घोषणांनी सारा आसमंत दुमदुमला होता. दरम्यान, गावफेरीत मतदार स्लिपचे वाटप करण्यात आले. रॅलीत विलास मरसाळे साहेब-उप मुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) जिप अमरावती, बालविकास प्रकल्प अधिकारी,अमरावती  यांचे समवेत सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका, आशावर्कर,शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग,नागरीक बंधु भगिनी यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. यावेळी उपस्थित सर्वानी मतदान शपथ ग्रहण करुन रँलीचा समारोप करण्यात आला.
       रॅलीत विस्तार अधिकारी योगेश वानखडे, कल्पना ठाकरे, आशिष गाडेकर विस्तार अधिकारी, मंगेश मानकर, राजेश श्रीखंडे, आरती चिटके,हेमंतकुमार यावले  जिल्हा स्वीप कक्षाचे संजय राठी, राजेश सावरकर, हेमंतकुमार यावले, अमरावती तालुका स्वीप कक्षाचे विनायक लकडे, सुपरवायझर, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी पंचायत आदींची उपस्थिती होती.
----------------------------------

Share This

titwala-news

Advertisement