जिल्हा स्वीप कक्ष व फटाका असोसिएशन व्दारा मतदार जनजागृती
Raju tapal
October 30, 2024
51
जिल्हा स्वीप कक्ष व फटाका असोसिएशन व्दारा मतदार जनजागृती
जिंगल्स व्दारे मतदान जनजागृती
अमरावती दि.३०-जिल्हा स्वीप कक्ष व फटाका असोसिएशन अमरावतीचे संयुक्त विद्यमाने सायन्सकोर मतदानावर गर्दीचे ठिकाणी मतदान जनजागृती उपक्रम मंगळवार २९ला राबविण्यात आला तसेच जिंगल्स व्दारे मतदान जनजागृती करण्यात आली.फटाका खरेदी करणार्या ग्राहकांना यावेळी खरेदीत विशेष सुट मिळणार आहे.
या कार्यक्रमाला बाळासाहेब बायस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अमरावती, सामान्य प्रशासन अधिकारी संजय राठी,प्रशासन अधिकारी, राहुल पवार सचिव चिल्लर फटाका विक्रेते, राजाभाऊ उंबरकर अध्यक्ष,चिल्लर फटाका विक्रेते,जिल्हा स्वीप कक्षाचे ज्ञानेश्वर घाटे,संजय राठी,नितिन माहोरे,श्रीकांत मेश्राम,हेमंतकुमार यावले,राजेश सावरकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन बाळकृष्ण आंधरे यांनी केले.यावेळी उपस्थित मतदारांना मतदानाची शपथ देण्यात आली.या उपक्रमाचे सर्व स्तरातुन कैतुक होत आहे.
=====================
जिल्हा स्वीप कक्षाव्दारे आगामी काळात विविध जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे या मध्ये दि.१० किंवा ११ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा, सर्व सामाजिक, व्यापारी, औद्योगीक, शैक्षणिक संघटना इत्यादीच्या सहभागाने व महानगर पालिका तथा क्रिडा विभागाच्या सहकार्याने जवळपास ५०००० नागरीकांची मतदान जनजागृती रॅली आयोजीत करणे.सर्व विधानसभा मतदार संघाअंतर्गत मतदान जनजागृती संदर्भात तालुका SVEEP नोडल अधिकारी व टिमचे मार्फत उपक्रम राबविणे.जिल्हा SVEEP कक्षाने तयार केलेल्या Weekly Planner ची प्रत सर्व शासकीय यंत्रणांना पुरविण्यात आलेली असून सर्व शासकीय यंत्रणांमार्फत विविध मतदान जनजागृती उपक्रम राबविणे. महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर व बचत गटातील महिला यांचा पिंक फोर्स तयार करुन गृह भेटी व्दारे महिला मतदारांमध्ये जनजागृती करणे.मागील लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४ मध्ये अमरावती जिल्हयातील विधानसभा मतदार संघामधील कमी मतदान झालेल्या १० टक्के मतदान केंद्रामध्ये विशेष लक्ष देवून जनजागृती उपक्रम राबविणे. मागील लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४ मध्ये अमरावती जिल्हयातील विधानसभा मतदार संघामधील महिलांचे ५० टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रामध्ये विशेष लक्ष देवून पिंक फोर्स मार्फत जनजागृती उपक्रम राबविणे. सोशल मिडीया मार्फत जनजागृती करणे व राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती वृत्तपत्रामध्ये व ईलेक्ट्रानिक मिडीया मार्फत प्रसिध्दी देणे.अशी माहीती संजीता महापाञ,भा.प्र.से.,स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अमरावती यांनी दिली आहे.
Share This