• Total Visitor ( 84482 )

मतदारांना मतदार स्लिप मिळणार-जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजीता महापाञ

Raju tapal November 04, 2024 9

मतदारांना मतदार स्लिप मिळणार-जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजीता महापाञ

अमरावती दि.४-अमरावती जिल्हातील ८विधानसभेची निवडणूक येत्या २०नोव्हेंबरला होत आहे.या करीता १००%मतदारांना मतदार स्लिप देण्यात येणार आहे.प्रत्येक गावात बीएलओ मार्फत व्होटर स्लिपचे वाटप होणार आहे.अशी माहीती जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापाञ यांनी दिली आहे.
        विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता अमरावती जिल्हयातील सर्व केंद्रावर किमान आवश्यक सुविधा (AMF) आणि १००% मतदारांना मतदार चिठठी (VIS) वाटप करण्याबाबतचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने अमरावती ग्रामीण कार्यक्षेत्रात प्रत्येक मतदार केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा (AMF) असल्याची आणि १००% मतदारांना मतदार चिठठी (VIS) वाटप झाल्याची खात्री करण्यासाठी खालील अधिकारी-कर्मचारी यांची जिल्हा परिषद स्तरावर समन्वयासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
   या करीता अमरावती जि.प.माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख,प्राथमिक शिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने,गजानन पाचपोर,सहा.अति.मुकाअ यांची नेमणूक करण्यात आली आहे. अधिकारी यांनी अमरावती जिल्हयातील आठही मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्र निहाय किमान आवश्यक सुविधा (AMF) आहेत याबाबतची खात्री संबंधित तालुक्यातील संस्था प्रमुखांकडून/शाळा मुख्याध्यापक यांचेकडून करुन घ्यावी. जिल्हा परिषद अतंर्गत ज्या इमारतीच्या ठिकाणी सुविधा आवश्यक आहे त्याबाबतची त्वरीत कार्यवाही जि.प. विभाग प्रमुख यांचेकडे व्यक्तिशः पाठपुरावा करुन करुन घ्यावी. सर्व ठिकाणी किमान सुविधा उपलब्ध आहे याबाबतचे लेखी प्रमाणपत्र तालुका अधिकारी (BDO/BEO) यांचेकडून प्राप्त करुन घ्यावे.
     मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक मतदारांपर्यत मतदार चिठठी (VIS) वाटप होणे आवश्यक आहे. आपलेस्तरावर BLO यांचेकडून नियमितपणे आढावा घ्यावा. BLO यांचेकडून प्रत्येक मतदारांपर्यंत चिठठी वाटप होत होईल याबाबत तक्रार प्राप्त होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी व तसे नियोजन करावे. तसेच दिनांक ६ नोव्हेंबर रोजी आयोजित बैठकीकरीता आपण उपस्थित राहावे.असे आदेश जिल्हा स्लीप कक्षाच्या नोडल अधिकारी संजीता महापाञ यांनी दिल्या आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement