मेळघाट विधानसभा मतदार संघातील घुंगरु बाजारात मतदान जनजागृती
Raju tapal
November 07, 2024
197
मेळघाट विधानसभा मतदार संघातील घुंगरु बाजारात मतदान जनजागृती
धारणी स्वीप कक्षाचा उपक्रम-शेकडो आदिवासी मतदारांचा सहभाग
धारणी/अमरावती दि.७-आदिवासी क्षेञात दिवाळी सणा नंतर तरुण-तरुणी सह वयोवृध्द आदिवासी संस्कृती जपण्याकरीता आणि आपली परंपरा आबादीत राहावी म्हणुन मोठ्या उत्सवात घुंगरू बाजार भरला जातो.या बाजारात आदिवासी नागरीक नविन पोषाख घालुन नृत्य सादर करतात या बाजारात तरुणांचा मोठा सहभाग असतो याचा फायदा घेत आगामी २०नोव्हेंबरला होणारी विधानसभा निवडणूक यात मतदानाचा टक्का वाढवा या करीता स्वीप कक्षाव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.याचा एक भाग म्हणुन स्वीप कक्षाव्दारे घुंगरू बाजारात जाऊन मतदारांना मतदानाचे महत्व पटवून दिले आणि त्यांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली.विशेष म्हणजे जनजागृती कक्षातील नोडल अधिकारी,कर्मचारी यांनी कोरकु भाषेत जनजागृती केली याला आदिवासी नागरीकांनी मोठा सहभाग घेतला होता.
SVEEP मतदार जनजागृती अभियानांतर्गत मेळघाट विधानसभा क्षेत्र 41मध्ये आज दिनांक 6 नोव्हेंबर 2024 रोजी SVEEP पथक प्रमुख सुनील खडे , पथक सदस्य बाबुलालजी जावरकर, योगेश मालवीय,श्रीमती उमेकर मॅडम व संजय इंगळे एबीपी फेलो व सर्व टीम यांनी मेळघाट विधानसभा क्षेत्रामध्ये दिवाळीनंतर होणाऱ्या घुंगरू बाजारामध्ये जाऊन घुंगरू नृत्याच्या माध्यमाने आपला संपूर्ण सहभाग नोंदवून अठरा वर्षावरील सर्व नागरिकांना 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये निर्भयपणे कोणताही जातीभेद धर्म न बाळगता आपले मतदान करण्याबाबत आव्हान करण्यात आले.यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली.विधानसभेत मतदानाचा टक्का वाढावा म्हणुन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटीयार आणि जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजीता महापाञ या करीता मतदार संघात स्वीप कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.या कक्षाव्दारे विविध नाविन्य पूर्ण उपक्रम अमरावती जिल्हात राबविण्यात येत आहे.असे स्वीप कक्षाचे राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
Share This