• Total Visitor ( 84305 )

मतदान जनजागृती भव्य बाईक महारॅली संपन्‍न

Raju tapal November 18, 2024 62

मतदान जनजागृती भव्य बाईक महारॅली संपन्‍न

अमरावती प्रतिनिधी,

मा.भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार अमरावती जिल्‍ह्यामध्‍ये SVEEP कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबतची कार्यवाही करण्‍यात येत आहे. मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी नागरिकांमध्‍ये जनजागृती आणि प्रबोधन करण्‍याच्‍या सुचना आहे. सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर,२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता मतदान जनजागृती भव्य बाईक महारॅली चे आयोजन करण्यात आले. ही मतदान जनजागृती रॅली मा. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे नेतृत्वात मनपा आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांनी आयोजित केली होती. सदर रॅलीमध्‍ये पद्मश्री शंकर बाबा पापळकर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्‍यवरांचे स्‍वागत करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्‍यात आली.  

जिल्हाधिकारी सौरभ कटियार व महानगरपालिका आयुक्‍त सचिन कलंत्रे यांनी सोमवारी अकॅडमी हायस्कूल, अमरावती येथे “मतदान जनजागृती रॅलीला” हिरवा झेंडा दाखविला. नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी. तसेच त्यांना जबाबदार नागरिक बनण्यास प्रोत्साहित करण्यासाठी रॅली काढण्‍यात आली. या रॅलीत सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक शिक्षकेत्‍तर कर्मचारी,  पालक वर्ग, नागरिक मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते.

सदर रॅलीची सुरुवात अकॅडमी हायस्‍कूल अमरावती येथून इस्माईल कटपीस ते जवाहर गेट समोरून गांधी चौक ते राजकमल चौक ते हमालपुरा  मार्गक्रमण करत रॅलीची सांगता सायन्सस्कोअर मैदान येथे करण्‍यात आली.

मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. या दृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी मतदान जनजागृती भव्य बाईक महारॅली काढण्यात आली. या जनजागृती रॅलीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विविध घोषण वाक्य असलेले फलक उपस्थितांच्‍या हातात होते.  

यावेळी पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी अमरावती जिल्‍ह्यातील सर्व मतदार बंधू भगिंनींना आवाहन केले की, त्‍यांनी मतदान करुन लोकशाही बळकटी करण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा. अमरावती सगळ्यात जास्‍त मतदान होण्‍यासाठी प्रत्‍येकाने पुढाकार घेवून इतरांनाही मतदान करण्‍याकरीता प्रोत्‍साहीत करावे. या रॅलीत त्‍यांनी नागरिकांसोबत हितगुज करुन त्‍यांना मतदान करण्‍यासाठी प्रोत्‍साहीत केले.   

सदर रॅलीमध्‍ये मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस,प्रकल्प संचालक ग्रामिण पुरवठा प्रिती देशमुख,
जिल्हा स्वीप कक्षाचे ज्ञानेश्वर घाटे,संजय राठी,राजेश सावरकर,हेमंतकुमार यावले,नितिन माहोरे,विशाल  विघे,अतुल देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, सहाय्यक आयुक्त सुभाष जानोरे ,नंदकिशोर तिखिले ,धनंजय शिंदे, भूषण पुसतकर, बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण, शिक्षणाधिकारी तथा स्विप नोडल अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम,  पशुशल्य चिकीत्सक डॉ. सचिन बोंद्रे, सहायक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, शाळा निरीक्षक योगेश पखाले, वहीद खान,संतोष केंद्रे, विभागातील प्रवीण ठाकरे ,योगेश राणे, पंकज सपकाळ, निजामुद्दीन काझी तथा सर्व विभाग प्रमुख, मुख्‍याध्‍यापक, शिक्षक वर्ग, मनपा कर्मचारी, अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 

Share This

titwala-news

Advertisement