धारणी तालुक्यातील विविध आदिवासी गावात मतदान जनजागृती
Raju tapal
November 16, 2024
20
धारणी तालुक्यातील विविध आदिवासी गावात मतदान जनजागृती
धारणी स्वीप कक्षाचा उपक्रम
दिनांक 13 नोव्हेंबर 2024 ला जिल्हा परिषद हायस्कूल, कलमखार येथे SVEEP पथक यांनी मतदार जनजागृती करिता भेट दिली. यावेळी पंचायत समिती कार्यालय, धारणीचे गटविकास अधिकारी मा. श्री. उदय कुसुरकर साहेब यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून विद्यार्थ्यांना आपले पालक, नातेवाईक, शेजारील व्यक्ती यांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करावे असे सांगून मतदार जागृतीची प्रतिज्ञा घेण्यात आली.
या कार्यक्रमाला मा.श्री. उदय कुसुरकर साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती, धारणी मा. श्री सुनील खडे SVEEP पथक प्रमुख तथा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धारणी, मा.श्री. बाबुलाल जावरकर SVEEP पथक सदस्य तथा विस्तार अधिकारी (शिक्षण) मा. श्रीमती मंगला उमेकर विस्तार अधिकारी (शिक्षण), श्री. संजय इंगळे एबीपी फेलो पंचायत समिती,धारणी , जिल्हा परिषद शाळा कलमखार चे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
आज SVEEP - मतदार जनजागृती पथक टिंगऱ्या येथे जाऊन पूजा महिला ग्रामसंघाच्या सर्व महिलांसोबत बैठक घेऊन मतदान करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. मतदान जनजागृती चे स्टिकर्स देऊन, सर्वांनी आपल्या नातेवाईक, शेजारी यांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करावे असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व महिलांना शपथ/ प्रतिज्ञा देण्यात आली.
यावेळी श्री. सुनील खडे स्वीप पथक प्रमुख तथा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धारणी, श्री. बाबुलाल जावरकर स्वीप पथक सदस्य तथा विस्तार अधिकारी (शिक्षण), श्री. संजय इंगळे एबीपी फेलो पंचायत समिती धारणी, श्रीमती सुनिता अरोटकर सीआरपी आणि ग्राम संघाच्या सर्व महिला उपस्थित होते.तसेच विविध शासकीय कार्यालय,शाळा,काॅलेज मध्ये मतदान जनजागृती करण्यात येत आहे.
Share This