आठवडी बाजारात दिला मतदानाचा संदेश
Raju tapal
November 13, 2024
21
आठवडी बाजारात दिला मतदानाचा संदेश
विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती
चांदुर रेल्वे स्वीपचा उपक्रम
अमरावती/चांदुर रेल्वे दि.१३- दिनांक 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सर्वत्र एकच वेळी विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकी दरम्यान धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील चांदुर रेल्वे स्विपने मतदार जनजागृती उपक्रमात तालुक्यातील आठवडी बाजाराचे गाव असलेले मालखेड येथे मंगळवारी आठवडी बाजारात वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी व मतदान जनजागृतीसाठी स्वीपद्वारा मतदार जागृतीचे पत्रक वाटप केली
विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाची आखणी करण्यात आली होती,यापूर्वी चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध शाळांनी आकाशकंदीलद्वारे मतदार जनजागृती केली.
धामणगाव रेल्वे विधानसभा स्वीप पथक प्रमुख नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम पार पडला
जनजागृती महत्वाची : संदीप बोडखे
निवडणूक कार्यात दुर्लक्ष होऊ नये अशा उपक्रमाच्या माध्यमातून निवडणूक जनजागृती करण्याचे ठरविले आहे. स्वीप कक्ष मार्फत 19 तारखेपर्यंत अशा नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचे धामणगाव विधानसभा क्षेत्राचे स्वीप पथक प्रमुख संदीप बोडखे यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी तेजश्री आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे यांच्या नेतृत्वात स्विप सदस्य सहाय्यक शिक्षक सुधीर केने,गटसमन्वयक मंगेश ऊल्हे, विषयतज्ञ श्रीनाथ वानखडे,प्रविण बोरकर,ग्रामविकास अधिकारी मदनगोपाल गवळी, प्रा.जितेंद्र चव्हाण,प्रा. जवंजाळ मॅडम,श्रीकृष्ण पवार सर , भागचंद बमनेल, ऋषिकेश देशमुख आदी उपस्थित होते.
Share This