सिनेमा हाॅल,ग्राहक मतदारांना मतदानाची शपथ
Raju tapal
November 11, 2024
9
तापडीया माॅलमधिल सिनेमा हाॅल व ग्राहक मतदारांना मतदानाची शपथ
मनपा व जिल्हा स्वीप कक्षाचा मतदानाची जनजागृती कार्यक्रम
अमरावती दि.११-अमरावती शहरातील गर्दीच्या ठीकाणी येत्या २०नोव्हेंबरला होणारी विधानसभा निवडणूकी करीता मतदारांना मतदानाचा आपला हक्क बजावावा या करीता जनजागृतीचा कार्यक्रम मनपा व जिल्हा स्वीप कक्षा व्दारे करण्यात येत आहे.अमरावती शहरातील प्रसिध्द असणारा व ग्राहकांची गर्दी असणारे गोपालनगर येथिल तापडीया माॅलमध्ये रविवारला सायंकाळी मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी मनपा स्वीप नोडल अधिकारी डाॅ.प्रकाश मेश्राम,जिल्हा स्वीप कक्षाचे ज्ञानेश्वर घाटे,संजय राठी, मनपा शाळा निरीक्षक योगेश पखाले ,राजेश सावरकर,हेमंतकुमार यावले,श्रीकांत मेश्राम,नितिन माहुरे,प्रवीण ठाकरे , सोमेश वानखडे, उज्वल जाधव ,प्रवीण ठाकरे ,संजय बेलसरे,पंकज सपकाळ ,योगेश राणे,प्रवीण माहुलकर,गणेश सावंत,विशाल विघे,आदित्य मेश्राम उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढावी याकरिता प्रशासन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करताना दिसून येत आहे परंतु मतदानावेळी सुशिक्षित वर्ग मतदानापासून वंचित राहत असल्याचा अनुभव बघता सुशिक्षित नव मतदारांना सुद्धा याबाबत जागृत करणे यावे या उद्देशाने अमरावती येथील स्थानिक तापडिया मॉल येथे उपस्थित शेकडो मतदार नागरिक यांना यावेळी मतदानाचा अधिकार बजावणी बाबत आवाहन करण्यात आले तसेच मतदानाची शपथ सुद्धा यावेळी देण्यात आली.
Share This