• Total Visitor ( 84213 )

वृक्षवल्ली देताहेत मतदान जनजागृतीचा संदेश

Raju tapal November 12, 2024 8

वृक्षवल्ली देताहेत मतदान जनजागृतीचा संदेश

डाएट येथे शिक्षक प्रशिक्षणार्थीनी साकारली अभिनव जनजागृती

जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजीता महापाञ यांची भेट

अमरावती / प्रतिनिधी / ता. 12-
दिवाळीपूर्वी नवीन नोकरीचे आदेश...नवीन नोकरीतील पहिलीच दिवाळी..दिवाळीच्या सुट्टीत लागलेले पहिलेच प्रशिक्षण..याच दरम्यान निवडणूक प्रशिक्षण...एवढ्या व्यस्ततेत सुध्दा नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणार्थीनी सात दिवसीय नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणही व्हावे व निवडणूक जनजागृती व्हावी यासाठी अनोखी शक्कल लढवित प्रशिक्षणार्थींनी काही हस्तलिखित तर डिजिटल स्वरूपात पोस्टर निर्मिती करत चक्क वृक्षवल्ली द्वारा मतदान जनजागृतीचा संदेश दिला.

मतदान जनजागृती करण्यासाठी अमरावतीमध्ये नानाविध संकल्पना राबवून मतदान जनजागृती करण्यात येत आहे.  रांगोळी रेखाटन, पणती सजावट, फलक सजावट, आकाश कंदील निर्मिती पासून पाळीव पशू रंगरंगोटी आदी विविधांगी उपक्रम राबविल्या गेले. यासह काही तरी वेगळ्या माध्यमातून संदेश देण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अमरावती येथे वृक्षांच्या माध्यमातून मतदान सदेश देऊन जनजागृती करण्यात आली.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती द्वारा नवनियुक्त शिक्षकांसाठी दिनांक 4 ते 11 नोव्हेंबर दरम्यान सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. औपचारिक प्रेरण कार्यक्रम अंतर्गत सदर 50 तासांचे प्रशिक्षण  प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद, खाजगी अनुदानित शाळांतील 137 शिक्षकांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. डाएट संस्थेतील वृक्षांवर माझा मत माझा अधिकार, होय मी मतदान करणार, छोडो अपने सारे काम, पहले चलो करे मतदान, पहिले पोटोबा... मगचं वोटोबा ल, ना जातीवर ना धर्मावर बटन दाबा कार्यावर,  लोकतंत्र की सूनो पुकार, व्होट डालकर चूनो सरकार, असे नानाविध संदेश पोस्टरच्या माध्यमातून संपूर्ण झाडावर तोरण बांधून व पोस्टर लटकावत संदेश देण्यात आले.

उपक्रमाचे कौतुक :-
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या आवारात उभारलेल्या या वृक्ष जनजागृतीचे स्वीप कक्षाच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रशिक्षणार्थीचे  कौतुक केले. यावेळी संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रेमला खरटमोल, डॉ.विजय शिंदे, पवन मानकर, अधिव्याख्याता डॉ.राम सोनारे, डॉ. दीपक चांदुरे, डॉ. विकास गावंडे आदींसह जिल्ह्यातील सव्वाशेचे वर शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.


अमरावतीचा वोटोबा ठरला दिशादर्शक
स्वीप कक्ष जिल्हा परिषद अमरावती मार्फत निवडणूक जनजागृती साठी वोटोबाची निर्मिती करण्यात आली. हाच वोटोबा सर्वांसाठी दिशादर्शक ठरला . वोटोबा प्रमाणे ईतर आयकॉन तयार करून मी मतदान करणारच असे संदेश दिले.
 

Share This

titwala-news

Advertisement