• Total Visitor ( 493983 )
News photo

कल्याण-डोंबिवलीत पाणीपुरवठा बंद नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन

Raju Tapal publisher April 24, 2026 58

कल्याण-डोंबिवलीत पाणीपुरवठा बंद नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन



कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देखभाल व दुरुस्ती कामांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बारावे,मोहिली,नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत व यांत्रिक उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामामुळे मंगळवार,28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8.00 ते रात्री 8.00 (12 तास) पाणीपुरवठा बंद राहणार आहे.



कल्याण शहर (पूर्व व पश्चिम)

कल्याण ग्रामीण भाग (मांडा-टिटवाळा,वडवली,आंबिवली,शहाड,अटाळी व इतर गावे)

डोंबिवली परिसर (पूर्व व पश्चिम) या ठिकाणी पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की,या काळात पाण्याचा जपून वापर करावा व आवश्यक तेवढा पाणी साठा करून सहकार्य करावे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement