• Total Visitor ( 429298 )
News photo

भांडूपमध्ये पाच दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

Raju tapal December 21, 2025 29

भांडूपमध्ये पाच दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा



मुंबई : भांडूपमध्ये पुढच्या आठवड्यात पाच दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. सोमवारी २२ डिसेंबरपासून २६ डिसेंबरपर्यंत भांडुपमधील बहुतांशी ठिकाणी तसेच विक्रोळीतील काही भागातही पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. मुंबई महापालिकेच्या एस विभागातील काही भागांत सोमवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून शुक्रवारी २६ डिसेंबर रोजी मध्यरात्री नंतर १ वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या कामासाठी २४०० मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या भागाचे छेद - जोडणी (क्रॉस - कनेक्शन) चे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. हे काम सोमवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून २६ डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर १ वाजेपर्यंत असे एकूण ८७ तास सुरु राहणार आहे. परिणामी, एस विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच, नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेतदेखील बदल होणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.भांडूपमधील बाधित भागांचा आणि पाणीपुरवठ्याच्या बदललेल्या वेळेचा तपशील पुढीलप्रमाणे भांडुप पश्चिम,क्वारी मार्ग, टेंभी पाडा,कोकण नगर,समर्थ नगर,भट्टी पाडा,उत्कर्ष नगर,श्रीरामपाडा,त्रिमूर्ती नगर,वाघोबावाडी,तानाजीवाडी,राम नगर,शिवाजी नगर (पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत) खिंडीपाडा ( पाणीपुरवठ्याची वेळ २४ तास) विक्रोळी पश्चिम (पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत) साई हिल,साकी विहार पंपिंग सप्लाय (पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत) रमाबाई नगर पंपिंग सप्लाय (पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.१५ ते रात्री ८ वाजेपर्यंत) हनुमान नगर,फुले नगर पंपिंग सप्लाय (पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्री ३.३० ते दुपारी ११.३० वाजेपर्यंत) एस विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणीउकळून - गाळून प्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement