• Total Visitor ( 369284 )
News photo

निवडणूक जाहीर झाल्यावर राज ठाकरेंसोबत चर्चा करु

Raju tapal July 19, 2025 64

निवडणूक जाहीर झाल्यावर राज ठाकरेंसोबत चर्चा करु;

उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य



सरकारवही केली टीका  



मुंबई :- अनेक वर्षांनंतर आम्ही दोघे व्यासपीठावर एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असं सूचक वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाही, झाली तर चर्चा करु शकतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवरही हल्लाबोल केला.



राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी एवढी गंभीर परिस्थिती आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. दिवसागणिक महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कालच विधान भवन परिसरातच मारामारी झाली. त्याबद्दल मी कालसुद्धा नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षांनी आज त्यावर उच्च स्तरीय समिती नेमली आहे. त्याबाबत माझा आक्षेप नाही. पण ही गुन्हेगारी फोफावली कशी? या गुंडांची विधान भवन परिसरात मारामारी करण्याएवढी हिंमत झाली कशी? त्यांची जबाबदारी कोण घेतंय? ज्यांच्याबरोबर आणले त्यांना आम्ही कारवाई करु वगैरे हे सगळं ऐकायला चांगलं आहे. पण मुळात एवढं धाडस झालं कसं?, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.



कालच विधानभवनात हाणामारी झाली, अध्यक्षांनी उच्चस्तरिय चौकशी समिती नेमली आहे. या गुंडांची इतकी हिंमत झाली आहे. कारवाई ऐकायला चांगली आहे, मात्र धाडस झालं कसं? असा सवाल उध्दव ठाकरेंनी केला. सत्तेच्या लालसेपोटी हे राजकारण सुरु आहे. हे सत्तेच माजकारण आहे असे ठाकरे म्हणाले. चड्डी गॅंग माईक टाईसन समजतात. गळ्यात दात घालून फिरणारे कसे माजलेत. यांना कोणी जाब विचारणार की नाही असे ठाकरे म्हणाले. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई आर्थिक राजधानी कोणाच्यारी डोळ्यात खुपत आहे. मुंबईतील महत्त्वाचे आर्थिक प्रकल्प गुजरातला हलवले मात्र मुंबई तोडण्याची हिंमत कुणामध्ये नाही. राज्यात कोणत्याही भाषेची सक्ती चालणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. गेल्या काही दिवसांआधी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीवर भाष्य करु नये, असे आदेश दिले आहेत. राज ठाकरेंच्या या आदेशामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता उद्धव ठाकरेंनी देखील स्पष्ट सांगितले. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू युतीबाबत नेमका कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement