विरोधकांनी विधीमंडळ अधिवेशनात उपस्थित राहुनही शपथविधीवर बहिष्कार टाकलेला आहे. या संदर्भात भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी पराभवाने भांबावलेली आहे. पराभव मोठ्या मनाने स्विकारायचा असतो. त्याने खचून न जात नव्या जोमाने काम करायचे असते. आम्हाला देखील लोकसभेत कमी जागा मिळाल्या होत्या. परंतू आम्ही जनतेसाठी कामाला लागलो आणि विजय मिळवून दाखविला आहे. विरोधक रोज नवनव्या सुरात रडत आहेत. त्यांना आत्मपरिक्षण करावे जनतेचे काम करावे असाही सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.विरोधक काही तरी नौटंकी करीत आहेत. त्यांना मतदान करुन निवडून देणाऱ्या जनतेचा ते अपमान करीत आहेत असा आरोप करीत असल्याचे प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यांनी शपथविधीवर बहिष्कार टाकून घटनेचा अपमान केला असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.