• Total Visitor ( 369941 )
News photo

बिहार विधानसभेच्या सर्व जागा लढवणार; चिराग पासवान यांची मोठी घोषणा

Raju tapal July 07, 2025 42

बिहार विधानसभेच्या सर्व जागा लढवणार;

चिराग पासवान यांची मोठी घोषणा;

भाजप आणि जेडीयूपुढे नवा पेच 



पाटणा :- केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहार राज्याच्या हितासाठी आगामी विधानसभा निवडणूक लढवायची असल्याचं म्हटलं. विरोधकांकडून आपल्या मार्गात अडथळा आणला जातोय, असं चिराग पासवान म्हणाले. चिराग पासवान यांनी छपराच्या राजेंद्र स्टेडियममध्ये नव संकल्प महासभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी त्यांचा राजकीय पक्ष लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) बिहार विधानसभेच्या 243 जागा लढवेल. चिराग पासवान यांचा राजकीय पक्ष सध्या केंद्रात एनडीएत आहे, त्यामुळं बिहारमध्ये भाजप आणि जदयूपुढं नवा पेच निर्माण झाला आहे.



चिराग पासवान पुढं म्हणाले की लोक विचारतात चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवेल का? याचं उत्तर सारणच्या पवित्र भूमीतून देत आहे, हो मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. ही विधानसभा निवडणूक एक एक बिहारी आणि प्रत्येक बिहारी कुटुंबासाठी महत्त्वाची आहे. यापुढं चिराग पासवान म्हणाले की जर चिराग पासवान निवडणूक लढवणार असेल तर 243 जागांवर लढेल. सर्व जागांवर चिराग पासवान म्हणून निवडणूक लढणार आहे. चिराग पासवान यांनी बिहारच्या लोकांसाठी लढणार असल्याचं म्हटलं, आपल्या भावांसाठी, आई बहिंणींसाठी बिहारमध्ये अशी एक व्यवस्था तयार करणार, एक बिहार बनवणार ज्यामुळं आपल्या भागाला विकासाच्या मार्गावर पुढं जाता येईल.



चिराग पासवान यांचे नातेवाईक खासदार अरुण भारती यांनी चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणूक लढवायला पाहिजे, कार्यकर्त्यांची ती भावना असल्याचं म्हटलं. चिराग पासवान यांनी सर्वसाधारण जागेवरुन विधानसभा निवडणूक लढवल्यास ते एका वर्गाचे, एका समाजाचे नेते नाहीत तर संपूर्ण बिहारचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात असल्याचं चित्र स्पष्ट होईल, असं अरुण भारती म्हणाले. चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) एनडीएचे महत्त्वाचे सहकारी आहेत. बिहारमध्ये भाजपसोबत नितीशकुमार यांचा जदयू, जीतन राम मांझी यांचा हम आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा सहभागी आहे.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement