• Total Visitor ( 84328 )

असं असेल राज्यातील नवं मंत्रिमंडळ?

Raju tapal November 28, 2024 42

असं असेल राज्यातील नवं मंत्रिमंडळ?

महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, कोणाला संधी कोणाचा पत्ता कट?

*मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने घसघशीत यश प्राप्त केली. त्यानंतर आता २ डिसेंबरला मुख्यमंत्रिपदासाठी शपविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. त्यापूर्वी आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याबाबत चर्चा रंगली आहे. एपीबीने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक २० ते २५ मंत्रिपदं, तर शिंदेंच्या शिवसेनेला १०-१२ तर, अजित पवार गटाला ७-९ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.सध्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळाली आहे, त्याची संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी:-

1)देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
2)गिरीश महाजन
3)रविंद्र चव्हाण
4)मंगलप्रभात लोढा
5)चंद्रशेखर बावनकुळे
6)आशिष शेलार
7)नितेश राणे
8)शिवेंद्रसिंहराजे भोसले
9)राहुल कुल
10)माधुरी मिसाळ
11)संजय कुटे
12)राधाकृष्ण विखे पाटील
13)गणेश नाईक
14)पंकजा मुंडे
15)गोपीचंद पडळकर

कोणाचा पत्ता कट होणार?

 विजयकुमार गावित
 सुधीर मुनगंटीवार

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी

1)उदय सामंत
2)शंभूराज देसाई
3)गुलाबराव पाटील
4)संजय शिरसाट
5)भरत गोगावले
6)प्रकाश सुर्वे
7)प्रताप सरनाईक
8)तानाजी सावंत
9)राजेश क्षीरसागर
10)आशिष जैस्वाल
11)निलेश राणे

या नेत्यांचा हिरमोड होणार?

दीपक केसरकर
अब्दुल सत्तार
संजय राठोड

राष्ट्रवादी संभाव्य मंत्र्यांची यादी

1)अजित पवार
2)धनंजय मुंडे
3)छगन भुजबळ
4)अदिती तटकरे
5)अनिल पाटील
6)हसन मुश्रीफ
7)धर्मराव बाबा अत्राम

एकनाथ शिंदेंचा मोदींना फोन

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी शिंदे गटाची इच्छा होती. त्यासाठी भाजपवर दबावही पाडण्याचाही प्रयत्न झाला. पण, विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपने मुख्यमंत्रिपदावरील ताबा सोडला नाही. अखेर, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत अखेर मौन सोडलं. यावेळी ते म्हणाले की, सरकार स्थापन करण्यात माझी काहीही अडचण नाही, भाजपने आम्हाला साथ दिली आम्हाला अडीच वर्ष सोबत काम केलं. भाजप जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. तसेच, शिंदेंनी पंतप्रधान मोदींना फोन करुन सांगितलं की, सत्ता स्थापनेत माझी काहीही अडचण नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल.
 

Share This

titwala-news

Advertisement