• Total Visitor ( 133713 )

यशवंत दिव्याग अस्मिता अभियानाचा शहापूर येथे शुभारंभ,

Raju Tapal December 31, 2021 61

यशवंत दिव्यांग अस्तमिता अभियानाचा उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे शुभारंभ करण्यात आला,,
,
यावेळी शहापूरचे आमदार दौलत दरोडा, अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, ठाणे सिव्हील रुग्णालयाचे डॉ भंडारी, डॉ अविनाश आहेर, डॉ विजयसिंग चंदले,डॉ सतीश नडके,डॉ सुवर्ण माने,शहापूर उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ मनोहर बनसोडे,तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते,
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, कल्याण, शहापूर, भिवंडी तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र काढणयासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात जावे लागत होते, खर्च हि होत होता व वेळ हि जात होता, त्या मुळे दिव्यांग बाधवांना त्रास सहन करावा लागत होता, ,
एकही दिव्यांग बांधव प्रमाणपत्रे पासून वंचित राहू नये, तसेच प्रत्येक तालुक्यातील रुग्णालयात दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्रे देण्यात यावी यासाठी अंपग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी शासनाच्या आरोग्य मंत्री व आरोग्य विभाग यांच्या कडे पाठपुरावा सातत्याने सुरु होता, 
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अतिशय चांगला निर्णय घेऊन राज्यातील जिल्हा आरोग्य विभागाला आदेश देवून प्रत्येक तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांना दिव्यांचे प्रमाणपत्रे देण्यात येतील,
त्या प्रमाणे ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात यशवंत दिव्यांग अस्मिता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी शहापूर तालुक्यातील टाकीपटार, हिव आदि गावखेडयातून दिव्यांग बांधव आले होते, त्या ची तपासणी करून तत्काल प्रमाणपत्रे व रेल्वे कंशीजन दाखले देण्यात आले,
यावेळी अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी सांगितले की आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिव्यांग बांधवांन साठी चागला निर्णय घेतला आहे, त्या बद्दल त्या चे दिव्यांग बाधवान कडून अभिनंदन करतो, गावखेडयातील एकहि दिव्यांग बांधव प्रमाणपत्रे पासून वंचित राहणार,प्रमाणपत्रे मुळे शासकीय योजनांचा लाभ घेता येईल,असे सांगितले,,यावेळी अपंग विकास महासंघ अध्यक्ष अशोक भोईर यांनी सवैच डॉवटरांचा सत्कार करण्यात आला,,

Share This

titwala-news

Advertisement