यवतमाळ येथे शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा संपन्न
Raju tapal
October 22, 2024
12
यवतमाळ येथे शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा संपन्न
राज्यभरातील प्रतिनिधीची उपस्थिती,विविध ठराव मंजुर
अमरावती दि.२१-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा रविवार दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी यवतमाळ येथील सहकार भवन,आर्णी रोड, येथे पार फडली.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उदय शिंदे राज्य नेते शिक्षक समिती,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय कोंबे राज्याध्यक्ष,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजन कोरगावकर राज्य सरचिटणीस शिक्षक समिती, बाबासाहेब कपिले माजी राज्य सरचिटणीस, आनंदा कांदळकर राज्य उपाध्यक्ष,राजन सावंत राज्य उपाध्यक्ष, सुरेश पाटील राज्य संघटक,सतीश सांगळे राज्य कार्यालयीन चिटणीस,किशन बिरादार राज्य संपर्कप्रमुख,राजेश सावरकर राज्य प्रसिद्धीप्रमुख,सय्यद शफिक अली उर्दू आघाडी प्रमुख, प्रफुल्ल फुंडकर राज्य प्रमुख जुनी पेन्शंन,गोकुलभाऊ राऊत जिल्हा अधयक्ष शिक्षक बँक अमरावती,ज्ञानेश्वर नाकाडे जिल्हा नेते यवतमाळ,महेश सोनेकर पतसंस्था १०९ अध्यक्ष ,गजानन देऊळकर,सुनिताताई जतकर,नामदेव जांभेवडेकर,वस्तीशाळा प्रमुख विजय खडसे,सुनिल भामरे,श्रीकांत देवरे,सुरेश पवार,बापु पारधी,प्रकाश सोनवणे,अरुण सोळूंके,संजय सुर्यवंशी,अनिल नासरे,विष्णु रोकडे,लिलाधर ठाकरे,विजय सुसर,पी.बी.घुमरे,मधुकर काकडे,एस.एस.वाघारे,अजयानंद पवार,शैलेन्द्र दहातोंडे,तुळशिदास धांडे,स्वप्नील भोग,संजय काळे,अशोक वैद्य,कालीदास येरगुडे,उमाजी कोडापे,विनोद घुगे,पुंडलिक रेकलवार अन्य राज्य पदाधिकारी उपस्थित होते.या सभेला महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांतील शिक्षक समितीचे राज्य आणि जिल्हा पदाधिकारी उपस्थित झाले होते. यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.तसेच मुख्यमंत्री 'माझी शाळा,सुंदर शाळा' स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या शाळांच्या मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षकांचा सुद्धां गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भा.वा. शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.स्वागत गीत व शिक्षक समितीचे गीतगायन दशरथ सूर्यवंशी जिल्हा प्रवक्ता शिक्षक समिती यवतमाळ धोबे सर,शिंदे सर यांनी केले. राज्य नेते उदय शिंदे यांची राज्य शिक्षण मंडळावर निवड झाल्या प्रित्यर्थ संपूर्ण राज्य कार्यकारिणी तर्फे शिंदे सरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष पुंडलीक रेकलवार,जिल्हा. सरचिटणीस संदीप मोहाडे यांचे कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत संभाजी निंबाळकर तालूकाध्यक्षमहागाव,मेघराज सुर्यंवंशी तालूका सचिव महागाव,प्रदिप गावंडे,राहुल बोबडे,विजय मुंगे तालूकाध्यक्ष उमरखेड,विनोद भारसागळे तालूका सचिव उमरखेड,पुष्पजीत राणे,रामकृष्ण केद्रे यांच्या संपर्काकातून ५० शिक्षकांचा प्रवेश शिक्षक समितीत झाला. राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून मान्यता घेतली. त्यानंतर राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी राज्य कार्यकारिणीचे कामकाज मांडले.यावेळी शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली आणि ठराव मंजूर करण्यात आले.या राज्य कार्यकारिणी आढावा बैठकीच्या पुर्वी झालेल्या कार्यक्रमात प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष पुंडलीक रेकलवार यांनी केले.मनोगत जुनी पेन्शन राज्यप्रमुख प्रफुल्ल पुंडकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात शिक्षक समितीच्या शिलेदारांचा तसेच आदर्श शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करतांना विजय कोंबे यांनी वेतन त्रुटी,जुनी पेन्शन,नवभारत साक्षरता,संघटनेची आंदोलनाविषयी भूमिका यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु कुमुद डाखोळे,सुभाष पारधी यांनी केले.तर आभार प्रदर्शन संदीप मोहाडे जिल्हा सरचिटणीस यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुंडलिक रेकलवार जिल्हाध्यक्ष, संदीप मोहाडे, जिल्हा सरचिटणीस, नानासाहेब नाकाडे जिल्हा नेते, प्रफुल्ल फुंडकर राज्य प्रमुख जुनी पेन्शन आघाडी , अशांना गुंडावार अध्यक्ष ग्राहक भांडार,महेश सोनेकर अध्यक्ष यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था विजय लांडे उपाध्यक्ष ग्राहक भंडार यवतमाळ संजय काळे, जिल्हा उपाध्यक्ष राधेश्याम चेले जिल्हा उपाध्यक्ष, विलास गुल्हाने मार्गदर्शक गजानन गिरी,अमोल माळे, दशरथ सूर्यवंशी, संभाजी निंबाळकर,पुष्पजीत राणे, विनोद क्षीरसागर, मुकेश भोयर,रविंद्र नंदुरकर, सुनील भोयर,अशोक चटप,समीर डाखोळे,अमरगुजर,हिरालाल राठोड, विवेक मोरस्कर,उमेश बुटले दीपक चांदोरे, सत्यम चौधरी विनोद गवळी,अभिजीत नवलकर,प्रविण सोनपराते,आशिष बागवाले, दीपक वारेकर,विजय वट्टी दर्शन बेंद्रे,यशवंत काळे मारुती काळेकर,उमेश डेहनकर ,दिलीप शिंदे,नम्रता बिसने वनिता झुरळे,भूमना कसरेवार ,हेमंत सिडाम,
शुभदा येवले, यांनी परिश्रम घेतले.असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
Share This