येरवड्यात इमारतीचा स्लॅब कोसळून १० जण जखमी
Raju Tapal
February 04, 2022
67
पुण्यातील येरवड्यात इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू ; १० जण जखमी
पुण्यातील येरवडा उपनगरातील शास्त्रीनगर येथील गल्ली क्रमांक ८ मध्ये एका इमारतीचा लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरू असताना सांगाडा अचानक कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला.
शास्त्रीनगर येथील वाडिया बंगला गेट नंबर ८ येथील नवीन इमारतीसाठी तळमजल्यावर लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरू होते. रात्री ११ वाजता हा सांगाडा अचानक कोसळला.
त्याखाली तेथे काम करत असलेल्या जवळपास १० कामगार खाली दबले गेले. अग्निशामक दलाला या घटनेची माहिती रात्री ११ वाजून १४ मिनिटांनी मिळाली. अग्निशामक दलाच्या ५ गाड्या, रूग्णवाहिका ,१०८ च्या १० रूग्णवाहिका, पोलीस घटनास्थळी पोहचले. लोखंडी सांगाड्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी ईलेक्ट्रिक करवतीचा वापर करून हा सांगाडा कापला. त्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले.
१० कामगारांना बाहेर काढून ससून रूग्णालयात पाठविण्यात आले. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
Share This