पुरंदर तालुक्यातील पाथरवाडी येथील पाझर तलावात १० वीच्या विद्यार्थ्याचा सेल्फीच्या नादात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि.१६ नोव्हेबरला सायंकाळी घडली.
कोंढवा खूर्द अग्निशमन केंद्राच्या जवानांनी रात्री साडेअकरा वाजता लाईफ रिंगच्या साहाय्याने मुलाला बाहेर काढले.
अनिश तानाजी खेडेकर वय -१५ रा.संभाजीनगर तीन हत्ती चौक धनकवडी असे मृत मुलाचे नाव आहे.
पाथरवाडी तलावामध्ये एक तरूण बुडाल्याची माहिती पोलीस पाटील सचिन दळवी यांनी सासवड पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून मुलाचा शोध सुरू केला.
पुण्यातील तरूण सहलीसाठी पाथरवाडी ता.पुरंदर याठिकाणी आले होते. याठिकाणी ते फोटो काढत होते यातील एक तरूण पाण्यात उतरला. त्याला पाण्याचा,खोलीचा अंदाज न आल्याने तो पडून पाण्यात बुडाला.
कोंढवा अग्निशमन दलाला रात्री १० वाजता मुलगा पाण्यात बुडाल्याची खबर मिळाली. रात्री साडेअकरा वाजता लाईफ रिंगच्या साहाय्याने मुलाला बाहेर काढले.
अनिश खेडेकर संभाजीनगर येथे राहात होता. सहकारनगर येथील विद्यानिकेतन शाळेत दहावीत शिकत होता. त्याचे वडील तानाजी खेडेकर रिक्षाचालक आहेत.