१५ मार्चला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
-------------------
१५ मार्चला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना,विजांचा कडकडाट गारपीट,वादळी वा-यांसह पावसाची शक्यता भारतीय हवामान खाते, कृषी हवामान पुणे प्रभागाने वर्तविली आहे.
भारतीय हवामान खाते ,कृषी हवामान पुणे प्रभागाने महाराष्ट्र राज्यासाठी दिलेल्या कृषी हवामान इशारा पत्रकात म्हटले आहे,
१५ मार्चला मध्य महाराष्ट्र व मराठवाडा विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट गारपीट,वादळीवारे सह पावसाची शक्यता असून विदर्भ, कोकण व गोवा विभागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
१६ मार्चला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट गारपीट,वादळी वारे सह पावसाची शक्यता असून कोकण व गोवा विभागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
१७ मार्चला विदर्भ विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट गारपीट,वादळी वारे सह पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, व मराठवाडा ,कोकण व गोवा विभागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
१८ मार्चला विदर्भ विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट ,वादळी वारे सह पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाडा विभागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
शेतकरी बांधवांना दिलेला सल्ला :-
हरभरा,गहू, ज्वारी,करडई, भाजीपाला आणि फळे ,टरबूज, कलिंगड,द्राक्षे,केळी संत्रा आणि पपई यासारख्या परिपक्व पिकांची काढणी लवकरात लवकर करून काढणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
नवीन लागवड केलेली फळझाडे आणि भाजीपाला पिकांचे वा-यापासून संरक्षण करण्यासाठी आधार द्यावा.
केळी,पपई,द्राक्षे आणि भाजीपाला ,फळे झाकण्यासाठी हेलनेटचा वापर करावा.
मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वारे, गारपिटीच्या काळात जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे असे कृषी हवामान सुचनापत्रकात म्हटले आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे