टिटवाळ्यातील रहिवाश्यांनी पैशांनी भरलेले पॉकेट परत करून घडविले माणुसकीचे दर्शन
टिटवाळा येथील रहिवाशी कुंदन सोनवणे व विजय मंडाळे हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'फ'/उत्तर विभाग माटुंगा येथे कार्यरत आहेत.दिनांक 22.09.2023 रोजी टिटवाळा येथून कर्तव्यावर जात असताना माटुंगा रेल्वे स्टेशनच्या बाहेर रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्ती
जुनेद फारुकी यांचे पैशांनी भरलेले पॉकेट त्यांना मिळाले असून त्यात रु.10030/- रोख रक्कम त्याचबरोबर जुनेद यांचे मूळ आधार कार्ड,पॅन कार्ड,3 ATM कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन ई.आढळून आले आहे. सदर व्यक्तीची अमानत त्या व्यक्तीला सही सलामत परत करण्याच्या प्रामाणिक हेतूने कुंदन आणि विजय यांनी आधार कार्ड वरील पत्यावर धारावी येथे स्वतः जाऊन जुनेद फारुकी यांची भेट घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला परंतु सदर व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध झाली नाही व त्यांचे घर बंद अवस्थेत असल्याचे आढळून आले.
जुनेद फारुकी यांच्या घराच्या शेजारील व्यक्तीस त्यांच्या विषयी विचारणा केल्यानंतर तेथील उपस्थित व्यक्तीनी जुनेद यांचा मोबाईल नंबर कुंदन आणि विजय यांना दिला तद्नंतर लागलीच जुनेद यांना संपर्क करून त्यांना कुंदन आणि विजय यांनी त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका 'फ/उत्तर' माटुंगा कार्यालयात बोलावून घेऊन जुनेद फारुकी यांचे पॉकेट व त्यातील रोख रक्कम तसेच मूळ कागदपत्र सही सलामत त्यांना परत केले. तद्नंतर सदर व्यक्तीने आपल्या भावना व्यक्त करीत असताना समाजात अजूनही प्रामाणिक चांगली माणसे असल्याचा प्रत्यय आपल्या रूपाने मला आला असून आपण केलेल्या अभूतपूर्व सहकार्याबद्दल मी तुमचा आजीवन ऋणी राहील अशा भावना जुनेद यांनी व्यक्त केल्या.
कुंदन आणि विजय यांच्या कार्यातून माणुसकीचे दर्शन घडले असल्याचे त्यांच्या मित्र - मंडळी मध्ये बोलल्या जात असून त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.त्याचबरोबर त्यांचे टिटवाळा येथील मित्र संदीप गवळी,डि.एम.नारे,निलेश उपाध्ये,जगदीश बागुल,प्रविण माळी, किरण भोये,शरद मस्के, गणेश वाघमोडे, योगेश गढवाले,बालाजी हाक्के, माधव माने,शशिकांत नाईक,मनोज नांदूरकर,मनोज सोनजे, रमाकांत पिंपळे आणि रविंद्र डामसे या सर्वांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले असून त्यांच्या कार्याची प्रेरणा आजच्या तरुण पिढीने घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.