वृषाली महिला सामाजिक संस्थेचा सांस्कृतिक मेळावा व सन्मान सोहळा संपन्न
सालाबाद प्रमाणे वृषाली महिला सामाजिक संस्थेचा सांस्कृतिक आनंद मेळावा 10 एप्रिल रोजी तावडेनगर येथे सायंकाळी ०६.०० वाजता संपन्न झाला
महिलांच्या स्टेजवरील सामूहिक नृत्य सादरीकरणा सोबतच शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध १५, भजनी गायीका, ७ संगीत गुरुवर्य ८ वादक व हरिपाठ मंडळ यांचा सन्मान व दत्तात्रय ठाकरे सामाजिक परिवर्तन, विद्याताई वेखंडे नारिशक्ती पुरस्कारणे सन्मानित करण्यात आले गायीकांनी गायलेल्या गाण्यावर मुलांनी वेशभूषासह सादरीकरण करण्यात केले या सुंदर सांस्कृतिक सोहळ्यात शिवसेना नेते आदरणीय प्रकाश पाटील यांच्या सौभाग्यवती पुष्पलता प्रकाश पाटील, प्रियांका बरोरा, अपर्णा खाडे, पुष्पा ठाकूर मा.शंकर खाडे साहेब, मा. राजेंद्र विठ्ठल भेरे, रवींद्र भेरे, सुभाष विशे संस्थेच्या वृषाली पाटील, संगीता सोनारे, समन्वयक सुरेश पाटील, विठ्ठल शिर्के, शिवाजी सोनारे, अशोक सोनारे, अखिल भारतीय कलावंत मंचचे बाळू शिंगोळे, रहिवासी संघाचे दत्ता विशे, मा नगरसेवक विनोद भोईर यांच्या हस्ते सर्वाना सन्मानित करण्यात आले, कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी पूनम धीर्डे, भारती सोनारे, मेघा पाटील, नम्रता कुडेकर, यांनी विशेष मेहनत घेतली अशी माहिती वृषाली सुरेश पाटील अध्यक्ष वृषाली महिला सामाजिक संस्था यांनी दिली.