• Total Visitor ( 133854 )

लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात 

Raju tapal January 25, 2025 48

लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात 

मुंबई :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. 26 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी  दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी 2025 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती दिली. 24 जानेवारी म्हणजेच पहिल्या दिवशी 1 कोटी 10 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली. 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जुलै 2024 पासून सुरुवात करण्यात आली होती. या योजनेद्वारे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम ऑगस्ट महिन्यात एकाच वेळी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जानेवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळेल. म्हणजेच एका लाभार्थी महिलेला 10500 रुपयांची रक्कम मिळालेली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिला होतं. महायुतीच्या नेत्यांनी त्यांचं सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दरमहा 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पानंतर त्याबाबत निर्णय होईल, असं सांगितलं होतं. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना  2100 रुपये मिळतील, अशी शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खात्यात 24 डिसेंबरला रक्कम वर्ग करण्यात आली होती. आता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात 24 जानेवारीला रक्कम वर्ग करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात 2 कोटी  52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती.
 

Share This

titwala-news

Advertisement