बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्टच्या वतीने 171 वा भिमाई जयंती म्होस्तव साजरा
भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असलेल्या मुरबाड मधील आंबेटेंबे येथे दि बुद्धीष्ट कल्चरल ट्रस्टच्या वतीने 171 वा जयंती मोहोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात झाला.
दरवर्षी माघी पौर्णिमेस माता भीमाईची जयंती त्यांच्या मुरबाड तालुक्यातील आंबेटेंबे येथील जन्मगावी साजरी होते. याच ठिकाणी शासनाच्या वतीने आंतराष्ट्रीय दर्जाचे भीमाई स्मारक प्रस्तावित आहे. बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्टचे संस्थापक दिवंगत दादासाहेब खरे यांच्या विद्यमाने भीमाई भूमीत प्रियाताई खरे यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये बुद्धवंदना सूत्रपटण व आठ सत्कारमूर्तींचा भीमाई पुरस्काराने गौरव यावेळी करण्यात आला. यावेळी सदम पत्रिकेचे संपादक आनंद देवडेकर व प्रमुख वक्ते होते. विचारपीठावर मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिते सरपंच रेश्माताई घरत, जेष्ठ साहित्यिका ऋणाताई पवार रिपाई चे जेष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे माधुरीताई सफाटे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून आरपीआयचे उपाध्यक्ष रमेश देसले सामाजिक कार्यकर्ते महेद्र गायकवाड, संतोष उघडे व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रमोद जाधव, रमेश जाधव हे होते तर संयोजक म्हणून डॉ. स्मिता खरे डॉ. वृषाली खरे रिपाई मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, टिटवाळा आरपीआय शहर अध्यक्ष विजयजी भोईर,विवेक साळवी, राजेश खरे, संगीता जाधव, अशोक पंडित, सुहास सावंत यांनी कामे केली. तर विशेष सहकार्य म्हणून महेंद्र गोविंद्र गायकवाड, स्वप्नील जाधव, योगेश उघडे, निखिल शिंदे, रवी पंडित हे होते. या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिमन्यू भालेराव यांनी केले. या प्रसंगी सभाअध्यक्ष प्रियाताई खरे वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप गिते व कान्होळ बोरिवलीच्या सरपंच रेश्माताई घरत यांनी आपले विचार मांडले.