१९ व्या पुणे बुक फेअरला पुण्यातील येरवडा परिसरात प्रारंभ झाला.
पुणे शहरात गेल्या २० वर्षापासून हा उपक्रम राबविला जात असून प्रसिद्ध साहित्यिक अशोक कामत यांच्या हस्ते बुक फेअरचे उद्घाटन झाले.
उद्घाटनपर भाषणात साहित्यिक अशोक कामत यावेळी बोलताना म्हणाले, पुणे बुक फेअर ही भविष्यात व्यापक चळवळ व्हावी आणि जीवनमुल्यांचे दर्शन त्यातून घडावे.
यंदाच्या या प्रदर्शनात ४० हून अधिक दालने असून त्यात देशभरातील नामांकित प्रकाशन संस्थांचा समावेश आहे.
केंद्र सरकारचा प्रकाशन विभाग ,जनगणना संचालनालय ,आकाशवाणी , शैक्षणिक संशोधन ,प्रशिक्षण परिषद यासारख्या सरकारी विभागांची दालने या प्रदर्शनात असून २५० हून अधिक विविध विषयांवरील किमान १० हजार पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, अर्थ, विज्ञान, आरोग्य क्रिडा तसेच गांधी साहित्य, बालसाहित्य, मान्यवरांची चरित्र ,नेत्यांची गाजलेली भाषणे असे विपूल साहित्य या दालनात उपलब्ध आहे. १ मे पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहाणार आहे.