2 कारचा चुराडा अन् 7 इंजिनियर विद्यार्थ्यांचा मृत्यु
देशानं आज सात भावी इंजिनिअर्स गमावले आहेत. रस्ते अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला. मृतदेह खेचून बाहेर काढण्याची वेळ पोलीस आणि स्थानिकांवर आली.या अपघातात ६ जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
आसाममधील गुवाहाटीमध्ये ही दुर्देवी घटना घडली.हे सगळे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहात असल्याचं सांगितलं जात आहे.रविवारी रात्री उशिरा गुवाहाटीतील जलुकबारी भागात झालेल्या एका रस्ते अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी या अपघातानंतर शोक व्यक्त केला.
स्कॉर्पिओ वाहनाचा वेग जास्त होता. आधी या गाडीने दुभाजकाला धडक दिली. हा वेग नियंत्रणात न आल्याने गाडी पुढे गेली आणि दुसऱ्या लेनमधून जाणाऱ्या पिकअप वाहनावर आदळली.मीडिया रिपोर्ट्सनुसार 10 जण कारमधून जात होते. त्यावेळी गाडी दुसऱ्या गाडीवर आदळली. नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली.त्यानंतर लेन सोड़ून पलिकडच्या लेनमध्ये दुसऱ्या पिकअप व्हॅनला आदळली.निओर डेका, उपांशु शर्मा, कौशिक बरुआ, कौशिक मोहन, राज किरण भुइयां, एमोन बरुआ, अरिंदम भौवाल अशी मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत.या अपघातात इतर 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.विद्यार्थी मृण्मय बोरा, अर्नव चक्रवर्ती आणि अर्पण भुइयां घायल अशी जखमी विद्यार्थ्यांची नावं आहेत.