३ कोटी ४५ लाख रूपयांचा गांजा जप्त ; रिसोड पोलीसांची कामगिरी
Raju tapal
October 19, 2021
33
३ कोटी ४५ लाख रूपये किंमतीचा साडेअकरा क्विंटल गांजा जप्त करण्याची कामगिरी रिसोड पोलीसांनी केली.
हिंगोली ते रिसोड रोडने आयशर ट्रकमध्ये गांजाची वाहतूक होत आहे या मिळालेल्या माहितीवरून रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकार ,अधिकारी व कर्मचा-यांनी हिंगोली - रिसोड रोडवर सापळा रचून एम एच २८ बी बी ०८६७ आयशर ट्रकची झडती घेवून आरोपी गोटीराम गुरूदयाल साबळे वय ५२ रा.कु-हा ता.मोताळा , सिद्धार्थ भिकाजी गवांदे रा.निमगाव ता. नांदुरा,प्रवीण सुपडा चव्हाण रा.हनवतखेड ता.मोताळा जि.बुलढाणा, संदीप सुपडा चव्हाण रा.हनवतखेड ता.मोताळा यांना गांजाची वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून ३ कोटी ४५ लाख रूपये किंमतीचा ११ क्विंटल ५० किलो एकूण ५६ कट्टे , २० लाख रूपये किंमतीची आयशर ट्रक असा एकूण ३ कोटी ६५ लाख रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.
रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकार, पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमनार, पी एस आय शिल्पा सुरगडे, अनिल कातडे, भागवत कष्टे, सुशील इंगळे, गुरूदेव वानखेडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
Share This