पिंपरखेड येथे वेगवेगळ्या ठिकाणी ३ बिबटे जेरबंद
शिक्रापूर (प्रतिनिधी):- शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे वेगवेगळ्या ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंज-यात ३ बिबटे जेरबंद झाले.
शुक्रवारी दि.२४ आॅक्टोबरला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी येथील गणेश वसंत बोंबे यांच्या घराजवळ लावलेल्या पिंज-यात अंदाजे साडेसहा वर्षांचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला.पारगाव रस्त्यालगत ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नरेश सोनवणे यांच्या घराजवळ लावलेल्या पिंज-यात साडेचार वर्षांची मादी जेरबंद झाली.दाभाडे मळा ओढ्यालगत लावलेल्या पिंज-यात शुक्रवारी रात्री पाच वर्षांची बिबट मादी जेरबंद झाली. वनविभागाचे कर्मचारी महेंद्र दाते व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तीनही बिबट्यांना माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल केले आहे असे समजते.