3 प्रभारी सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या
राजू टपाल.
कल्याण:- कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी केल्या.
यामध्ये प्रामुख्याने भारत पवार(अधिक्षक)6 फ प्रभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त त्यांची बदली 9 आय च्या प्रभारी आयुक्त पदी नियुक्ती केली. किशोर ठाकूर(वरिष्ठ लिपिक) प्रभारी सहाय्यक आयुक्त 9 आय प्रभाग यांची बदली होऊन प्रभारी सहाय्यक आयुक्त परिमंडळ 2 याठिकाणी नियुक्ती केली आहे. तर हेमा मुंबरकर(अधिक्षक)प्रभारी सहाय्यक आयुक्त परिमंडळ 2 यांची बदली होऊन प्रभारी सहाय्यक आयुक्त 6 फ प्रभाग येथे करण्यात आल्या आहेत. ऐन आचारसंहिता लागल्यानंतर बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी सदरील आदेश आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी काढलेले आहेत.