टेम्पोचालकाला अडवून टेम्पोमधील ५ लाख रूपयांचे सिगारेटचे बॉक्स लुटून नेणा-या ५ जणांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांची शिक्रापूर -चाकण रस्त्यावर कारवाई
----------------
शिरूर तालुक्यातील वाडा गावठाण येथे टेम्पोचालकाला अडवून टेम्पोतील ५ लाख रूपये किंमतीचे सिगारेटचे बॉक्स लुटून नेणा-या ५ जणांना स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी जेरबंद करून शिक्रापूर पोलीसांच्या ताब्यात दिले.
स्वप्निल दत्तात्रय कंद्रूप वय -३४ रा.करंदी ता.शिरूर, संतोष प्रकाश पवार वय -२४ , कृष्णा देविदास सोनवणे वय -२४ दोघेही रा.रांजणगाव गणपती ता.शिरूर, अविनाश दत्तात्रय दरेकर वय -२६ रा.शेलगाव ता .खेड जि.पुणे, योगेश बाळासाहेब मिडगुले वय -२७ रा.कडाची वाडी, चाकण ता.खेड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा नजीक असलेल्या वाडा गावठाण येथील सिल्व्हर ओक येथील जवळून टेम्पोचालक अनिल विठोबा वाघ वय -४२ वर्षे टेम्पोमध्ये सिगारेटचे बॉक्स घेवून २ ऑक्टोबरला अहमदनगर येथे जात होते.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कारमधून आलेल्या चौघांनी टेम्पोचालकाला अडवून त्यांचे अपहरण केले. टेम्पोचालकाला वाजेवाडी परिसरात सोडून दिले त्यानंतर टेम्पो शिक्रापूर परिसरात मिळून आला.त्यावेळी टेम्पोमधील ५ लाख १७ हजार रूपये किंमतीचे सिगारेटचे बॉक्स चोरीस गेले होते.
याबाबत टेम्पोचालक अनिल विठोबा वाघ वय ४२ वर्षे रा.वाडेगव्हाण ता.पारनेर जि.अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे पुढील तपास करीत आहेत.https://www.titwalanews.com/assets/uploads/photo-9.jpeg