70 वर्षानंतर सराई वाडीत पाणी आले
मुरबाड तालुक्यातील साखरे सराई वाडीत रस्ता पाणी 70 वर्षा पासून नव्हते दोन किलोमीटर अंतरावर येथील ग्रामस्थांना पाणी आणावे लागत होते.
सराई वाडीतील 32 कुटुंब पाणी व रस्त्या पासून वंचित राहीली होती हा प्रश्न अशोक सराई यांनी पत्रकार राजेश भांगे यांना सांगितले भांगे यांनी अनेकदा बातम्या प्रसिद्ध करून व त्यानंतर मुरबाड तहसीलदार कार्यालय समोर उपोषण तसेच जिल्हाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून अखेर पाणी पुरवठा प्रश्र सोडला. आता पुढचा प्रश्न रस्ता डांबरीकरण करणे हा गंभीर प्रश्न असून या रस्त्यामुळे तीन गेले असून एक जण मोटारसायकल वरून पडून अपंग झाला आहे.ही गंभीर दखल शासनाने घ्यावी अशी मागणी पत्रकार राजेश भांगे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.