७३ वा भारतीय प्रजासत्ताक दिन शिरूर शहर परिसरात उत्साहात साजरा
७३ वा भारतीय प्रजासत्ताक दिन शिरुर शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला .मुख्य शासकीय ध्वजारोहण शिरुर तहसिल कार्यालयाच्या आवारात तहसिलदार रंजना उबरहांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार ॲड. अशोक पवार ,निवासी नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी , ,नगराध्यक्षा वैशाली वाखारे आदी उपस्थित होते .शिरुर नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सभागृह नेते प्रकाश धारिवाल,मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर आदी यावेळी उपस्थित होते . शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीत उपसभापती प्रवीण चोरडिया यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. यावेळी बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले उपस्थित होते. हुतात्मा स्मारक येथे विद्याधाम प्रशालेतील सेवानिवृत्त कर्मचारी आप्पा मास्तोळी यांचा हस्ते झेंडावंदन झाले .लोकजागृती संघटनेचे ॲड ओमप्रकाश सतीजा ,रवींद्र धनक , संजय बारवकर ,विलास गोसावी आदी यावेळी उपस्थित होते .बोरा महाविद्यालयात महाविद्यालयीन नियामक मंडळाचे अध्यक्ष उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते झेंडावंदन झाले .
लाटेआळी येथे माजी सैनिक विनायक कळमकर यांच्या हस्ते झेंडावंदन झाले भाजपाचे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर ,विजय नरके यावेळी उपस्थित होते .
छत्रपती शिवाजी गणेश मित्र मंडळ लाटेआळी येथे माजी सैनिक दत्तात्रेय भालेकर यांच्या हस्ते झेंडावंदन झाले
रुपेश राकेचा यावेळी उपस्थित होते हलवाई चौक गणेश मित्र मंडळ हलवाई चौकात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पुजारी यांच्या हस्ते झेंडावंदन झाले .यावेळी मंडळाचे अध्यक्ष सतीश धुमाळ , शांतीलाल मुथा ,अशोक काळे आदी उपस्थित होते.
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.