पिण्याचे पाणी दूषित केल्याने गुन्हा दाखल
डुऱ्याच्या पाण्यात काही तरी मिसळून ते पाणी दूषित केल्याप्रकरणी एकावर रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील उगवती-पाचकुडेवाडी, करबुडे येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.
याबाबत गावातील सदाशिव गोविंद पाचकुडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश पाचकुडे हे वाडीतील लोकांना काहीतरी करून नेहमी त्रास देतात, असे म्हटले आहे. त्याला डुऱ्याच्या पाण्यात काहीतरी मिसळताना वाडीतील लोकांनी पाहिले होते. वाडीतील लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने पिण्याच्या पाण्यात काहीतरी मिसळून पाणी घाण करून दूषित केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.