वणव्यात शेतकऱ्याचे 100 भाताचे भारे जळून खाक
टिटवाळा :- कल्याण तालुक्यातील मौजे पोई येथील अल्पभूधारक शेतकरी तानाजी महादू झाटे यांनी भात कापणी करून आपल्या शेता शेजारील खळ्यात भाताचे १०० भारे साठवून ठेवले होते. गुरुवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान आलेल्या अचानक वणव्यामुळे सदरील सर्वच्या सर्व भाताचे भारे जळून राख झाले आहेत.
तानाजी झाटे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या कुटुंबाचा शेतीवरच उदरनिर्वाह होत असतो. भाताचे भारे जळाल्याने त्यांच्यावर फार मोठे संकट ओढवले आहे.