वृशदीप वात्सल्य सामाजिक संस्थेतर्फे भव्य जनजागृती शिबीर संपन्न
राजू टपाल.
टिटवाळा :- वृशदीप वात्सल्य सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक सक्षमीकरणावर भव्य जनजागृती शिबीर नुकतेच प्रथमेश मंगल कार्यालय येथे संपन्न झाले. यावेळी सदर शिबिरात सहभाग नोंदविलेल्या महिलांना सन्मानपत्र देण्यात आले.तसेच महिलांना सामाजिक कार्यात सहभागी होऊन महिला सक्षम कश्या होतील याबाबदल आलेल्या पाहुण्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला मोरेश्वर (अण्णा) तरे,विनायक काळण,किशोर भाई शुक्ला,मनीष चोहान,संतोष पवार,हिरा ताई कांबळे,स्वप्नील वहाणे,निता पाठक मॅडम,सुप्रिया मोहिते,प्रभाकर भोईर,पत्रकार राजू टपाल,रक्षिता जाधव,संजय गुंजाळ,नितीन देव,रुपाली पाटील,छाया सिंघनिया,शशिकला माने इत्यादी जणांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी महिलांसाठी शरद इंगळे, नॅन्सी यांनी मनोरंजन पर गीत सादर केले. तर जमलेल्या महिलांनी आपल्यामधील उपजत कलागुण सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.